बुक कट्टा पब्लिकेशन वाचक आणि लेखकांचा हक्काचा कट्टा! पुस्तके वाचनाच्या आवडतीतून २०२१ साली वाचकांसाठी सामाजिक माध्यमातून सुरू झालेला वाचकांचा हक्काचा कट्टा म्हणजेच ' बुक कट्टा'. वाचक आणि पुस्तके यांना केंद्रबिंदू ठेवून सुरू झालेला प्रवास या २०२५ वर्षांत ' बुक कट्टा पब्लिकेशन ' असा झाला आहे. विचारांची आदान प्रदान करून वाचक जोडण्याचा प्रयत्न असतो.सामाजिक माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीत भेटलेल्या,जोडलेल्या प्रत्येक वाचकाला जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न नेहमी असतो.
पुस्तकांसंबंधी कार्य:
प्रकाशन संस्थेचे कुमार अनिकेत साळुंके हे स्वतः गेली १५ वर्षाहून अधिक काळ विविध पुस्तकांचे साहित्य वाचन करत आहेत. पुस्तक वाचनाच्या आवडीतून त्यांनी २०२१ साली ' बुक कट्टा ' हे सामाजिक माध्यमात प्रत्येक वाचक, लेखक, प्रकाशक, वितरक यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बुक कट्टा वाचकांसाठी:
बुक कट्टा हा वाचकांसाठी दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहील. वाचक हा फक्त ग्राहक नसून तो आमच्या पुस्तक वाचनाच्या चळवळीचा महत्वाचा अविभाज्य भाग आहे.
Experience our visual storytelling through interactive displays showcasing the essence of literary artistry
Our gallery represents the multifaceted nature of storytelling - each image reveals a new perspective, just like the layers of meaning found in great literature. These interactive displays showcase the dynamic relationship between reader, author, and story.
All 20 episodes in one playlist
In-depth review of Episode 1
In-depth review of Episode 2
In-depth review of Episode 3
In-depth review of Episode 4
In-depth review of Episode 5
बुक कट्टा या वाचन चळवळीमागील प्रेरणादायी व्यक्ती
पिंपरी चिंचवड येथील अनिकेत साळुंके हे एम.कॉम, जी.डी.सी. अँड ए शिक्षण घेतलेले लेखक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. २०२१ मध्ये बुक कट्टा या उपक्रमाची स्थापना करून वाचन संस्कृती जपण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.
जिल्हा जालना येथील अजिंक्य साबळे यांनी बी.एससी व एम.ए (राज्यशास्त्र) पूर्ण केले आहे. ५०० हून अधिक पुस्तकांचे वाचन करून इन्स्टाग्रामवर पुस्तक समीक्षणाद्वारे वाचकांना मार्गदर्शन करतात.
सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, अन्नवाटप व वृक्षारोपणाच्या माध्यमातून बुक कट्टाशी जोडलेले अजय शिंदे हे २०२१ पासून कार्यक्रम व्यवस्थापन व समन्वयाचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत.